23.4 C
New York
Saturday, July 12, 2025

Buy now

spot_img

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ७०,०००/- हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, ७ आरोपी गजाआड

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ७०,०००/- हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, ७ आरोपी गजाआड

पिंपळनेर : पिंपळनेर पोलिसांनी आज, दि. ०८.०७.२०२५ रोजी मौजे मैंदा येथे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून ७ जुगारींना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि तीन मोटारसायकलींसह एकूण सुमारे ७०,०००/- हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैध धंद्यांना चाप बसल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोउपनि गोलवाल साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत मैंदा गावातील अर्जुन अंकुशकर यांच्या घराशेजारील लिंबाच्या झाडाखाली काही इसम तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, पोउपनि श्री. गोलवाल साहेब यांनी प्रभारी अधिकारी सपोनि श्री. घुगे साहेब यांना कळवून सपोनि मधुसूदन घुगे, पोउपनि अर्जुन गोलवाल, पोशि/८८७ अविनाश सानप, पोशि १२६० दिलीप सोनवणे, पोशि १९४४ वैजिनाथ मगर यांच्या पथकासह दोन पंचांना घेऊन दुपारी ३:४५ वाजता छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच अर्जुन अंकुशकर यांच्या घराशेजारील लिंबाच्या झाडाखाली मोटारसायकली गोलाकार लावून ७ इसम पत्त्यांवर पैसे लावून तिर्रट जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांना पाहताच जुगार खेळणारे इसम पळून जाण्याच्या तयारीत असताना, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मात्र, एक इसम आपली मोटारसायकल सोडून पोलिसांची नजर चुकवून पळून जाण्यात यशस्वी झाला.

अटकेतील आरोपींची नावे

१. अर्जुन ईश्वर अंकुशकर (वय ३८, रा. मैंदा, ता.जि. बीड)
२. रणजितसिंग नानकसिंग टाक (वय ३३, रा. वडवणी, ता.जि. बीड)
३. संतोष रामनाथ मुळे (वय ३५, रा. बाहेगव्हाण, ता. वडवणी, जि. बीड)
४. शंकर पांडुरंग ढगे (वय २७, रा. चिंचवण, ता. वडवणी, जि. बीड)
५. सुभाष हिरामण चव्हाण (वय ३६, रा. ढोरवाडी परभणी तांडा, ता.जि. बीड)
६. आतिष हरिदास मस्के (वय २३, रा. बाहेगव्हाण, ता. वडवणी, जि. बीड)
७. विलास बापुराव बापमारे (वय ३८, रा. मैंदा, ता.जि. बीड)

यांच्या ताब्यातुन एकूण 23880/- रु रोख, 7 मोबाईल व 3 दुचाकी असा एकूण रु. ३,७३,८८०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोउपनि अर्जुन गोलवाल यांनी दोन पंचांसमक्ष जागेवरच पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेतला आणि आरोपींसह पिंपळनेर पोलीस ठाण्यात हजर झाले. याप्रकरणी पोकॉ/२०२१ शशिकांत अण्णासाहेब ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कलम १२ (अ) नुसार वरील ७ आरोपी आणि पळून गेलेल्या अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक श्री.नवनीत कॉंवत, अपर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि मधुसुदन घुगे, पोउपनि अर्जुन गोलवाल, पोलीस अंमलदार अविनाश सानप, दिलीप सोनवणे, वैजिनाथ मगर यांनी केली आहे.

ads

Related Articles

ताज्या बातम्या