तेलगाव-धारूर रस्त्यावर अपघात; एकजण जागीच ठार
तेलगाव : केज येथील शेख आसरफ बाबा मियाँ हे शुक्रवार दि.१३ जुन रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान भोगलवाडी फाटा येथील बस स्टॉपवर थांबले होते. यावेळी धारूरकडुन भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने शेख आसरफ बाबा मियाँ यांना जोराची धडक दिली. यात शेख आसरफ हे जागीच ठार झाले. धडक दिलेले वाहन कांही क्षणातच घटनास्थळारून पसार झाले. यावेळी भोगलवाडी फाट्यावर असलेल्या लोकांनी अपघात जागेवर जाऊन त्या व्यक्तीस तात्काळ उचलत दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु ते जागीच ठार झाले होते. प्रथम त्याची ओळख पटत नव्हती. मात्र त्यांच्या जवळील आधारकार्डवरून त्यांची ओळख पटुन त्यांचे नाव शेख आसरफ बाबा मियाँ रा. टिपु सुलतान चौक केज असे असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती समजताच दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव ढाकणे व त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन, घटनेची पाहणी करून प्रेत शवविच्छेदनासाठी धारूर ग्रामीण रूग्णालयात पाठवले