25.9 C
New York
Monday, July 14, 2025

Buy now

spot_img

धनंजय मुंडेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट

धनंजय मुंडेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट

दिवटे कुटुंब माझ्या घरातले, शिवराजच्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी : धनंजय मुंडे

आम्ही शिवराज दिवटे व कुटुंबियांच्या पाठीशी; मुंडेंनी शिवराज सह दिवटे कुटुंबीयांशी संवाद साधत दिला धीर

या घटनेत जाती धर्माचा संबंध नाही – धनंजय मुंडे यांनी पोलीस अधीक्षक यांच्या भूमिकेचे केले समर्थन

अंबाजोगाई : दोन दिवसांपूर्वी परळी तालुक्यात मारहाण झालेल्या शिवराज दिवटे या तरुणाची अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात जाऊन माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी भेट घेत त्याच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच शिवराज व त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. शिवराज दिवटे याला परळी तालुक्यात एका टोळक्याने केलेल्या मारहाणीनंतर तू सध्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून त्याच्यावर सुरू असलेल्या उपचारांची ही धनंजय मुंडे यांनी स्वरातीचे अधिष्ठाता डॉक्टर धपाटे यांच्याकडून माहिती घेतली. शिवराज सह संदिपान दिवटे व दिवटे कुटुंब हे माझ्या घरातील असल्यासारखे आहेत, सुरज ला मारहाण केलेल्या संपूर्ण ठोक्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी धनंजय मुंडे यांनी केले असून. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी यासंदर्भात ठोस भूमिका घेतली आहे पुढे तपासांती सर्व गोष्टी स्पष्ट होतील. तसेच या प्रकरणात कुठेही जाती धर्माचा काहीही संबंध येत नाही असे स्वतः एसपींनी देखील स्पष्ट केले असल्याचे धनंजय मुंडे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले. आपण शिवराज व दिवटे कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत, पोलीस योग्य तो तपास करतील आणि आरोपींना कठोर शिक्षा मिळेल, असा विश्वास असल्याचे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. यावेळी माजी आ.संजय दौंड, ज्येष्ठ नेते राजकिशोर मोदी, रा कॉ चे तालुकाध्यक्ष राजाभाऊ औताडे, विश्वंभर फड, भागवत तावरे यांसह आदी उपस्थित होते.

ads

Related Articles

ताज्या बातम्या