इंजि. देविसिंह शिंदे यांच्या पाठपुराव्याला पोलिस अधिक्षक नवनीत कॉंवत यांची साथ
एकाच दिवसात पासपोर्ट विभागातील सर्व प्रलंबित प्रस्ताव मार्गी
बीड : डिजिटल सिग्नेचरच्या तांत्रिक कारणामुळे मागील दीड महिन्यापासून पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पासपोर्टचे प्रस्ताव प्रलंबित होते. अनेकांना यासाठी चकरा माराव्या लागत होत्या. या प्रश्नी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी तात्काळ या प्रकरणी लक्ष घालून डिजिटल कारवाई संदर्भात निर्देश दिले. स्वत: देविसिंह शिंदे हे सॅाफ्टवेअर इंजिनिअर असल्यामुळे त्यांनी तांत्रिकदृष्ट्या सक्षम व योग्य पाठपुरावा केल्यामुळे डिजिटल सिग्नेचरचा तांत्रिक बिघाड लवकर दुर होऊन एकाच दिवसात बीड जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयातील पासपोर्ट विभागातील सर्व प्रलंबित प्रस्ताव मंजुर होऊन पुढे दाखल झाले व मार्गी लागल्याची विक्रमी कामगिरी बीड जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच झाली. त्यामुळे कालच दि. १६/०५/२०२५ वार शुक्रवार रोजीच गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस अधिक्षक कार्यालयातील पासपोर्ट विभागात प्रलंबित असलेले पासपोर्टचे सर्व प्रस्ताव मंजुर होऊन पुढे दाखल होत मार्गी लागले आहेत. अशी माहिती जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इंजि. देविसिंह शिंदे यांनी दिली. या संदर्भात त्यांनी सांगितले की, गेल्या दीड महिन्यापासून पोलीस अधिक्षक कार्यालयातील पासपोर्ट विभागाच्या निरीक्षकांच्या डिजिटल सिग्नेचरचा तांत्रिक प्रश्न निर्माण झाल्यामुळे अनेक नागरिकांचे पासपोर्टचे प्रस्ताव प्रलंबित होते. अभिजीत उबाळे यांनी या संदर्भातील माहिती दिल्यानंतर मी स्वतः पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचारी सत्यनारायणजी खेत्रे यांच्याशी संपर्क साधून अडचण समजून घेतली. दि. २ मे रोजी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांना भेटून निवेदन दिले. पोलिस अधिक्षकांनी तातडीने या प्रश्नी लक्ष घालत संबंधीत अधिकाऱ्यांना निर्देश दिल्यानंतर डिजिटल सिग्नेचर सुधारीत करण्यात आले असून काल दि. १६/०५/२०२५ वार शुक्रवार रोजी एकाच दिवसात बीड जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयातील पासपोर्ट विभागातील सर्व प्रलंबित प्रस्ताव मंजुर होऊन पुढे दाखल होत मार्गी लागल्याची विक्रमी कामगिरी बीड जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच झाली. पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांनी हा प्रश्न तातडीने सोडविला, त्याबद्दल त्यांचे आभार मानत असल्याचे जिजाऊ प्रतिष्ठानचे इंजि. देविसिंह शिंदे यांनी म्हटले आहे.