27.7 C
New York
Saturday, June 28, 2025

Buy now

spot_img

दुचाकीला वाचविताना कार उलटली; तीन ठार तर पाच जखमी

दुचाकीला वाचविताना कार उलटली; तीन ठार तर पाच जखमी

अंबाजोगाई : दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले. तर एकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि.१४) दुपारी अंबाजोगाई – आडस रोडवरील उमराई पाटी नजीक घडली. माजलगाव तालुक्यातील पाथरूड येथून (एम एच 05 सी व्ही 9186) या कारमधून अंबाजोगाईकडे एका विवाह समारंभास उपस्थित राहण्यासाठी एक कुटुंब जात होते. आडस अंबाजोगाई रोडवरील उमराई पाटील नजीक असलेल्या दत्त मंदिरासमोर एक दुचाकीस्वार अचानक आडवा आला. या दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार जागीच पलटी झाली. यात शौकत अहमद शेख व खय्युम अब्बास अत्तार हे दोघे जागीच ठार झाले. तर शामू जागीरदार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती असून या अपघातात जखमी झालेल्या सर्वांवर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ads

Related Articles

ताज्या बातम्या