23.4 C
New York
Saturday, June 28, 2025

Buy now

spot_img

नेकनूर पोलीसांनी गहाळ झालेल्या दहा मोबाईलचा शोध घेवून तक्रारदारांना केले परत

नेकनूर पोलीसांनी गहाळ झालेल्या दहा मोबाईलचा शोध घेवून तक्रारदारांना केले परत

 

नेकनूर : पोलीस ठाणे नेकनूर येथे नागरीकांचे मोबाईल गहाळ झाले बाबतच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने सदर तक्रारीच्या अनुषंघाने गहाळ मोबाईलचा तांत्रिक विश्लेषणाव्दारे शोध घेणे कामी नेकनूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री चंद्रकांत गोसावी यांनी पोलीस स्टेशन नेकनूर येथे असलेले सायबर डेक्सचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे व अमलदार पो.अ. 46 दादासाहेब उबाळे, पो.अ. 1885 विशाल क्षिरसागर याना आदेश दिले होते त्याप्रमाणे पोलीस ठाणे नेकनूर येथील प्राप्त गहाळ मोबाईल तक्रार मधील गहाळ मोबाईलचा तांत्रिक विश्लेषणाव्दारे शोध घेवून वेगवेगळया कंपनीचे एकूण 10 मोबाईल एकूण 192000/- रूपयाचे किमतीचे मोबाईल मुळ मालक तक्रारदार यांना परत केलेले आहेत. त्यांचे नावे खालील प्रमाणे, ऋषीकांत तांदळे रा. अंबीलवडगाव ता.जि.बीड,बळीराम बाबुराव कदम रा. मांडवखेल ता.जि.बीड,संजय लॉखडे रा. नेकनूर ता.जि. बीड,अशोक रामदास काळे रा. घारगाव ता.जि.बीड,संदिप अंगदराव शिंदे रा. नेकनूर ता.जि.बीड,सुरेश साहेबराव निर्मळ रा. लिंबागणेश ता.जि.बीड,विजयकुमार सदाशिव सोळंखे रा. खरमाटा ता. केज जि. बीड,श्रेयश लक्ष्मण ढास रा.खडकीघाट ता जि.बीड,सुधाकर पवार रा. सफेपुर ता.जि.बीड, कैलास ज्ञानोबा खाकरे रा. बीड जि.बीड वरीलप्रमाणे तक्रारदार यांना त्यांचे गहाळ मोबाईलचा शोध घेवून सदर तक्रारदार यांना परत केल्याने सदरचे मोबाईल तक्रारदार यांनी पोलीसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले असून पोलीसांचे आभार मानले आहेत. त्यामुळे पोलीसांची जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री नवनीत काँवत साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम अंबाजोगाई, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कमलेश मिना साहेब केज, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे नेकनूरचे मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री चंद्रकांत गोसावी साहेब, पोउपनि श्री आप्पासाहेब रोकडे साहेब, पो.अ. विशाल क्षीरसागर, पो.अ. दादासाहेब उबाळे तसेच टेक्निकल अॅनालिसेस सेल बीड येथील पोलीस अमलदार विक्की सुरवसे यांनी केले आहे.

ads

Related Articles

ताज्या बातम्या