परळी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात परळीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरणे आणि सामाजिक तेढ निर्माण करणे, अशा आरोपांखाली परळी शहरात मनोज जरांगेंविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.परभणीमध्ये झालेल्या जाहीर सभेत जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरत घरामध्ये घुसून मारू, असे शब्द वापरले होते. याप्रकरणी तुकाराम आघाव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.